पुण्यात तापमानाचा पारा 40 अंशावर; अवकाळी पावसाचेही संकट

पुणे : एप्रिलमध्ये पुण्यातील तापमान प्रथमच ४० अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.पुणे जिल्ह्यासह इतर अनेक शहरांचे तापमान 40 अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान सतत पडणारा पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही.

फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे 40.4 आहे. त्यानंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये 40.2 अंश नोंदविले गेले. बुधवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता.



राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तापमान वाढला आहे. पुण्यात बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी पाऊसही झाला. दरम्यान आगामी चार दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यात व राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



