पुणे शहर

गणेश कला क्रीडा केंद्रात लवकरच सुरू होणार कोविड हॉस्पिटल..

पुणे : गणेश कला क्रीडा केंद्र या ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असून त्याची महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार व इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या व त्या प्रमाणात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सची जाणवणारी कमतरता भरून काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. Covid Hospital to start at Ganesh Kala Krida Kendra!

महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात असणाऱ्या महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरता बेड्सची संख्या मोठ्या क्षमतेने वाढवण्यात येत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

Img 20210223 wa0156

या कामाच्या पाहणी प्रसंगी काँग्रेस गटनेते आबा बागुल, नगरसेवक धनराज घोगरे, प्रिया गदादे, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ.ऋतुपर्ण शिंदे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, शिवाजी लंके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

गणेश कला क्रीडा मंच ही महानगरपालिकेची वास्तू असून या ठिकाणी डॉ. ऋतुपर्ण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून व महानगरपालिका, काही स्वयंसेवी संस्था व सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या ठिकाणी १०० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

डॉ. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात घेतलेला मदतीचा निर्णय निश्चितच अभिमानास्पद व स्वागतार्ह आहे. या ठिकाणी सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटल च्या उभारणीस लागणारी आवश्यक ती सर्व यंत्रणा व साधने महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केली जात आहेत. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत टप्प्या-टप्प्याने हे काम पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये