पुणे शहर

श्री रामेश्वर पतसंस्थेच्या  अध्यक्षपदी बाळासाहेब हगवणे यांची बिनविरोध निवड

पुणे:  जिल्ह्यासह शहरात अग्रणी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या  नांदेड -जेपी नगर येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक व किरकटवाडीचे माजी आदर्श सरपंच  बाळासाहेब  अर्जुनराव  हगवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सहायक अधिकारी संतोष शिंगाडे यांनी कामकाज पाहिले.
यावेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सचिन दशरथ दागंट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  नुकत्याच झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर पॅनेलने निळकंठेश्वर पॅनेलचा दारुण पराभव केला होता.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

पतसंस्थेचे  सर्व १३ संचालक  रामेश्वर पॅनेलचे आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब हगवणे म्हणाले, सभासदांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता पतसंस्थेचा कार्यभार अधिक पारदर्शक केला जाणार आहे ‌ . सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे पतसंस्था वाटचाल करत आहे. त्यामुळे आगामी काळात दोनशे कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करणार आहे तसेच ठेवीदार व कर्जदारांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी पतसंस्थेचे संचालक  विकास  दांगट , विलास मते, बाळासाहेब घुले , अभिजित घुले ,राजेंद्र हगवणे , देवीदास एकनाथ लगड , राजेश  देवकर , विनादेवी मते, मनिषा  मोरे, विकास कोल्हे , नागेश सोपान शिंदे आदी  उपस्थित होते.

Img 20250517 wa01877107867507973333265
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये