पुणे शहर

चंद्रकांत पाटील आयोजित दांडिया महोत्सवास बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राजक्ता माळीच्या उपस्थितीने तरुणाईच्या आनंदात भर

दांडिया हा नवरात्रोत्सवातील आनंद साजरा करण्याचे माध्यम – चंद्रकांत पाटील

बाणेर : नवरात्रोत्सवानिमित्त बाणेर मध्ये ५-६ दोन दिवस दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्ध, तरुण-तरुणी सारेच या महोत्सवात उत्साहात सहभागी झाले होते. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या उपस्थितीने तरुणाईच्या जल्लोषात आणखीनच भर घातली.

Img 20241007 wa00108206671167665679173

महायुती सरकारने यंदाही निर्बंधमुक्त वातावरण नवरात्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गरबा रास दांडीया या नृत्यप्रकाराची तरुणाईमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गरबा रास दांडियांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडीमध्ये दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या महोत्सवात घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा नृत्य सादर करताना तरुण व तरुणी पारंपारिक पेहरावात सहभागी झाली.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

या महोत्सवात प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही उपस्थिती लावली. यावेळी तिने फुलवंती चित्रपटातील मदन मंजिरी गाण्यावरील नृत्याविष्कार सादर करत तरुणांची मने जिंकली. प्राजक्ताच्या नृत्याविष्काराच्या विविध छटा तरुण- तरुणींनी आपल्या कॅमे-यात टिपल्या. तर लकी ड्रॉमुळे अनेकांना प्राजक्तासोबत सोल्फी काढण्याची संधी मिळाली.

Img 20241007 wa00065088176896130087560



यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, “पोटाची भूक भागल्यानंतर  मनाची भूक भागविण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची आवश्यक्ता असते. हिंदू समाजात संपन्नता असल्याने आपला आनंद साजरा करायचा असतो. मराठी दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे सण, व्रत, वैकल्याच्या निमित्ताने हा आनंद साजरा करायला मिळतो. त्यातील प्रमुख ३० सणांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी सारखे सण आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सवास हा आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे.”

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये