हुतात्मा भाई कोतवाल स्मारकाचे काम लवकरच सुरू करणार-रोहीत अप्पा काटे

पुणे- स्वातंत्र्यासाठी बलिदान देताना कृषी, सहकार, शिक्षण, विधी, समाजकारण, आरोग्य, राजकारण आदी अनेक क्षेत्रात एकाच वेळी भरीव योगदान देणारे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे स्मारकाचे काम पिंपरी चिंचवड मनपाच्यावतीने लवकरच सुरू करणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक रोहीत अप्पा काटे यांनी केले ते बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी हे होते.याप्रसंगी नगरसेवक संजय कणसे,प्रदेश सचिव राजेंद्र पंडीत,पिंपरी चिंचवड अध्यक्ष हेमंत श्रीखंडे,पुणे शहराध्यक्ष राजेश भोसले,प्रदेश निरीक्षक प्रदीप वाळुंजकर,परकाश तिरलापूरकर,रेल्वे बोर्डाचै सदस्य विशाल वाळुंजकर,मनाम अध्यक्ष गणेश वाळुंजकर,नागेश कोकाटे,योगेश पवार,अभय श्रीमंगले,भिष्मा गायकवाड,नितीन कुटे,अशोक पंडित,सूर्यकांत भोसले,संतोष शिंदे,गणेश शिंदे,विनायक गायकवाड,प्रशांत गायकवाड आदि अनेक पदाधिकारी उपस्थित होते
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी म्हणाले की,भाई कोतवाल यांचे स्मारक तात्काळ उभे करून पि चिंचवड मनपाने त्यांचा धडा पाठ्यपुस्तकात समावेश करणेकामी सहकार्य करण्याची मागणी केली.सुत्रसंचालन हेमंत श्रीखंडे,प्रास्ताविक रेल्वे बोर्डाचे सदस्य विशाल वाळुंजकर तर आभार राजेश भोसले यांनी मानले.




