कोथरुड
नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन

कोथरूड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या कार्यअहवालाचे व कॅलेंडर चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ , शहराध्यक्ष जगदीश मुळीक , सभागृह नेते गणेश बिडकर , उपमहापौर सरस्वती शेंडगे , स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेविका हर्षाली माथवड म्हणाल्या, वर्षभरामध्ये नागरिकां साठी विविध कामे मार्गी लागली आहेत. माझ्या कामाची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी योग्य दखल घेऊन शाबासकी दिली. ही माझ्या कामाला मिळालेली पावती असल्याचे मी समजते.




