सिनेजगत

‘3 इडियट्स’ फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन

मुंबई : ‘3 इडियट्स’ या हिंदी चित्रपटात लायब्रेरियन दुबे ही  भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. किचनमध्ये काम करत असताना अखिल हे पाय घसरून पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला. 

जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्ट यांच्यासोबत 3 फेब्रुवारी 2009 रोजी त्यांनी विवाह केला आहे. दोघांनी ‘क्रम’, ‘मेरा दिल दीवाना’ सारख्या टीव्ही मालिकेत काम केलं आहे. 2019 मध्ये त्यांनी ‘मजनू की ज्युलिएट’ नावाची एक शॉर्ट फिल्म देखील केली. अखिल मिश्रा यांनी ‘डॉन’, ‘वेल डॉन अब्बा’, ‘हज़ारों ख्वाहिशें’ सारख्या सिनेमात काम केलं. ‘उतरन’ या प्रसिद्ध मालिकेतही अखिल मिश्रा यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अखिल मिश्रा यांचं निधन झालं तेव्हा त्यांची पत्नी सुजैन बर्नर्ट ही हैद्राबादमध्ये शुटींग करत होती. अखिल मिश्रा यांच्या निधनाची माहिती मिळताच सुजैन तात्काळ हैद्राबादमधून परतल्या आहेत. ‘माझा जीवनसाथी गेला. माझं हृदय तुटलं’, अशा भावना सुजैन यांनी व्यक्त केल्या आहेत. पतीच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये