
पुणे : डी. वाय. पाटील डेंटल काॅलेज ने ऑफलाईन परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. याला विरोध करित युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम ,विस्तारक राजेश पळसकर यांच्या पुढाकराने युवासेनेच्या शिष्टमंडळाने डीन व कुलगुरूंची भेट घेऊन राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ॲानलाईन परिक्षा घ्यावी.किवा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली अन्यथा युवासेनेकडुन परिक्षा उधळण्याचा इशारा देण्यात आला.
कुलगुरु एन. जे. पवार यांनी विद्यापीठाच्या परिक्षा व्यवस्थापन विभागाशी चर्चा करुन सोमवार पर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
याबाबतीत बोलताना युवा सेना राज्य विस्तारक राजेश पळसकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परिक्षेचे नियोजन म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. तातडीने हि परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. किंवा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्या पध्दतीने आंदोलन करण्यात येइल.



