पुणे शहर
एक हजार स्कूल बस चालकांना भाजपतर्फे प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

पुणे : पुणे शहरातील एक हजार स्कूल बस चालकांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) करण्यात आले.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे राज्यभरात सर्व शाळा बंद असल्याने स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटकाळात मदत करण्यासाठी भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे, असे आमदार शिरोळे यांनी धनादेश वाटपाच्या वेळी बोलताना सांगितले. भाजप सदैव आपल्याबरोबर राहील अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी स्कूल बस चालकांना दिली.
यावेळी डॉ.दबडगांवकर, दीपक नागपुरे, श्रीपाद ढेकणे, दीपक पोटे, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, योगेश बोराडे, राजेंद्रसिंघजी, वाघे आणि जोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.




