महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळली, दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम

लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या आहेत, तर पुण्याला जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रस्त्यावर पडलेले दगड हटवण्यासाठी जेसीबी आणि ट्रक घटनास्थळी दाखल झाले आहेत, पण पावसामुळे दरड हटवण्यामध्ये व्यत्यय येत आहे.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये