पुणे शहर, जिल्हा

भोर मधून किरण दगडे पाटील यांची अपक्ष उमेदवारी कायम ; निवडणुकीत रंगत येणार; किटली चिन्हावर निवडणूक लढविणार

मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी – किरण दगडे पाटील

पुणे : भोर विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत महायुती मधील बंडखोरी रोखण्यात भाजप नेतृत्वाला अपयश आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने किरण दगडे पाटील यांना किटली हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून किरण दगडे पाटील भारतीय जनता पक्षाकडून इच्छूक होते. आणि त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र महायुतीच्या जागा वाटपात भोर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाला देण्यात आला. त्यामुळे किरण दगडे पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.

किरण दगडे पाटील म्हणाले, मी भोर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काम करीत आहे. मात्र हि जागा दुसऱ्या पक्षाला गेली. मात्र महायुती मधील अनेक कार्यकर्त्यांनी मला प्रत्यक्ष भेटुन पाठिंबा दिला असून हिंदूत्ववादी संघटनांनी देखील मला पाठिंबा दिला आहे. मी केलेल्या कामाच्या जोरावर मी निश्चित विजयी होईल असा मला विश्वास आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576
Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये