प्रशासनाच्या चुकीमुळे खडकीतील लीजधारकांना आलेल्या वाढीव बिलाच्या नोटीसा अखेर रद्द

आमदार सिध्दार्थ शिरोळे यांची माहिती
पुणे : प्रशासनाच्या चुकीमुळे लीजधारकांना आलेल्या वाढीव बिलांच्या नोटीसा रद्द करण्याचे आश्वासन खडकी कॅंन्टोन्मेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार यांनी दिल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
खडकी येथील बऱ्याच लीजधारकांना खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या प्रशासनाच्या चुकीमुळे वाढीव बिलांच्या नोटीसा आल्या आहेत. या संबंधीच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार यांच्यासमवेत मी आज शुक्रवारी बैठक घेतली. त्यात, वाढीव बिलांच्या नोटीसा रद्द करून सुधारीत नोटीस पाठविणे आणि चुकीच्या नोटीसीच्या आधारे बिल भरलेल्यांना पैसे परत देण्याचे प्रमोद कुमार यांनी मान्य केले, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी पत्रकात दिली आहे.
या बैठकीला धर्मेंश शहा, दीपक अग्रवाल, ॲड. सुनील अग्रवाल, मालोजी गादेवार, विनोद राठोड, दादा कचरे, अजित पवार आदी उपस्थित होते.




