पुणे शहर

31 डिसेंबर निमित्ताने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे : नववर्ष साजरा करण्यासाठी पुणे शहरातील लष्कर (कॅम्प) आणि डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रस्ता आणि जेएम रस्ता भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे. नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

तर 31 डिसेंबरला रात्री 7 वाजेपासून ते 1 जानेवारीला पहाटे 5 वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन करण्यात आला आहे.

लष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजेपासून गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद केली आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. संबंधित वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून वाहतूक लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल. दरम्यान वाहतूक शाखेतर्फे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहनही पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

नो-व्हेईकल झोन
31 डिसेंबरला रात्री 7 वाजेपासून ते 1 जानेवारीला पहाटे 5 वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये