महाराष्ट्र

आमदार पुत्राची व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाठ यांच्या मुलाने केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. घडलेल्या प्रकारावर आणि दिलेल्या धमकीवर आमदार संजय शिरसाठ किंवा त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. याप्रकरणात ते काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. अद्याप तरी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

संजय शिरसाठ यांनी २०१७ साली आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एकूण साडे चार लाख रुपयांची होती. त्यातील काही रक्कम शिरसाठ यांनी दिली. पण उरलेल्या रकमेसाठी त्यांनी मला त्रास दिला. मी कित्येक फोन केल्यानंतर काहीतरी डिस्काऊंट कर म्हणून मी त्यांना ७५ हजारांची सूट दिली. त्यानंतर ४० हजार रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं. पण मी जेव्हा पैसे आणायला त्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा त्यांनी मला केवळ २० हजार रुपये दिले. त्यानंतर मी सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे… आता पैसे मागू नको… तुला जर ४० हजार रुपये पाहिजे होते, तर मग आम्ही दिलेले २० हजार रुपये तू का घेतले, असा प्रश्न विचारत तू जर असेच पैसे मागत राहिला तर तुझे हातपाय तोडेन, अशी उघड धमकीच सिद्धांत शिरसाठ यांनी व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना दिली.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये