कर्वेनगरमध्ये मोफत स्मार्ट कार्ड वाटप मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद..

कर्वेनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरुड मतदार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद शिंदे व नीता शिंदे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत स्मार्टकार्ड वाटप मोहिमेला कर्वेनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेत सर्व खासगी व शासकीय ठिकाणी लसीचे दोन डोस घेतले असल्याचा पुरावा म्हणून लागणार युनिव्हर्सल पास, पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपये पर्यंतचा विमा, अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये व अंशत अपंगत्व आल्यास एक लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असणारे ई-श्रम कार्ड व नागरिकांना रुग्णालयात जाताना दरवेळी फाईल घेऊन जाण्याची गरज भासू नये त्यांचा सर्व आरोग्य इतिहास डिजिटल आय डी द्वारे पाहता यावा यासाठी चे हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
कर्वेनगरमधील श्रमिक वसाहत, काकडे सिटी व आकाश नगर जुना जकात नाका या ठिकाणी स्मार्टकार्ड वाटप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वरील कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांकडून गर्दी करण्यात येत होती. शेकडो नागरिकांना या लाभदायक स्मार्ट कार्डस्चे वाटप करण्यात आले.




