फक्त ९९९ रुपयांमध्ये मध्ये सिटीस्कॅन सेवा

कोठारी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
पुणे- सामाजिक बांधिलकी जपत अनेक आजारांवर योग्य निदान करण्यासाठी कोठारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वडगावशेरी येथील डायग्नोपीन सेंटर येथे फक्त ९९९ मध्ये सिटीस्कॅन सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेसाठी बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण जैन धर्मगुरू प.पु. प्रवीण ऋषीजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कोठारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या डायलेसिस सेंटर, कँसर केमो थेरपी सेंटर या विविध भागाला जैन धर्मगुरू प.पु. प्रवीण ऋषीजी भेट दिली. या प्रसंगी कोठारी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख प्रफुल कोठारी व मितेश कोठारी यांनी ते करत असलेल्या कार्यांची माहिती त्यांना दिली.



डायग्नोपीनचे पुण्यात १३ सेंटर सुरु असून प्रत्येक सेंटरला अतिशय अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांचे सर्व रिपोर्ट अतिशय वेगाने व अचूक मिळतात. बसवण्यात आलेली ३२ स्लाईस असलेली मशीन ३ मिनटांच्या आत सिटीस्कॅन पूर्ण करते. सध्या कोविड मध्ये या मशीनचा खूप फायदा होईल. इतरांच्या तुलनेत सर्व टेस्ट सुमारे ५० टक्के कमी किमतीत केल्या जात आहेत. असे कोठारी यांनी यावेळी सांगितले. डायग्नोपीन व कोठारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य अविरत चालू आहे. यावेळी सतीश बनवट, महावीर नहार, नेमीचंद सोलंकी, सुरेंद्र संचेती, शांतीलाल कोठारी, प्रकाश चोरडिया आदी उपस्थित होते.



