चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केलेला फिरता दवाखाना वस्ती विभागातील नागरिकांसाठी वरदान : विनोद मोहिते

कोथरुड : कोथरूड मतदार संघाचे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेला फिरता दवाखाना वस्ती विभागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून नागरिकांची आरोग्य विषयक होणारी मोठी गैरसोय दूर झाली असल्याचे विनोद मोहिते यांनी सांगितले.
आज हा फिरता दवाखाना कर्वेनगर मधील साईबाबा मंदिरा शेजारी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. यावेळी वडार वस्ती, श्रमिक वसाहत परिसरातील आजारी रुग्णांनी या दवाखान्यात येऊन वैद्यकीय उपचार करून घेतले.
कोरोना जागतिक महामारीच्या संकटातून आता आपण बाहेर पडत आहोत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून हा फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
हा मोफत फिरता दवाखाना दैनंदिन वेळापत्रकानुसार वस्ती भागात जाऊन, वस्ती भागातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन, आवश्यकतेनुसार औषधोपचार पुरविले जाणार आहेत.




