महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर ; दीड वर्षानंतर बाहेर येणार पण ?

Nawab Malik मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना हा जामीन देण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी हा जामीन केवळ दोन महिन्यांसाठी वैद्यकीय कारणासाठी देण्यात आला आहे. मुंबईतील कुर्ला येथील जमीन आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी मालिक यांना अटक करण्यात आली होती. 23 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

मलिक यांनी अनेक वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केले होते पण न्यायालयाने ते फेटाळले होते. मलिक यांची अटक राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का होता. त्यांना आता जामीन मिळाला असला तरी तो केवळ दोन महिन्यांसाठी असणार आहे.

Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये