पुणे शहर

कोथरुडमध्ये तृनावत राक्षसाचा वध देखावा पाहण्यासाठी गर्दी

कोथरुड : कोथरुड मधील संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाने साकारलेला तृनावत राक्षसाचा वध हा हलता पौराणीक देखावा पाण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष करून हा देखावा लहान मुलांना आकर्षित करत असून पालक आपल्या मुलांना घेऊन हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.

संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाने पौराणीक हलत्या देखाव्याची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने केलेल्या देखाव्यात दरवर्षी असणारी भव्य हलती मूर्ती गणेशोत्सवाच्या काळात कायमच चर्चेत राहते. त्यामुळे पालक या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी दरवर्षी आपल्या मुलांना घेऊन येत असतात. या वर्षी कृष्णाने केलेला तृनावत राक्षसाचा वध हा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यात कृष्ण ज्यावेळी तृनावत राक्षसाचा वध करतो त्यावेळी राक्षसाची भव्य मूर्ती ज्या पद्धतीने मंडपाच्या बाहेर येते ते पाहण्यासारखे आहे.

संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ कायमच मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवत असते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात मंडळाने केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या संकट काळात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, घरी एकट्या असणाऱ्या ज्येष्ठांना जेवणाचे डबे पुरवणे तसेच रस्त्यावर राहणाऱ्यांना अन्न वाटप असे उपक्रम मंडळाने घतले. या बरोबरच रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम मंडळाकडून दरवर्षी राबवण्यात येत असतो. उमेश भेलके हे या मंडळाचे व्यवस्थापक आहेत.

समस्त गावकरी मंडळ कोथरूड
साई बाबांची लीला या विषयावर जिवंत देखावा

Img 20220908 wa0074

समस्त गावकरी मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी साई बाबा यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित साई लीला या विषयावर जिवंत देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये