पुणे शहर

अजित पवार आणि गिरीश बापट एकाच मंचावर पुण्यातील राजकीय घडामोडींबाबत काय बोलणार याची उत्सुकता

पुणे: पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची चर्चा रंगलेली असतानाच आता भाजपच्या एका बड्या आमदाराला प्रवेश देऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. भाजपच्या या बड्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊद्या (ता.२६ मंगळवार रोजी) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार गिरीश बापट एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने पवार आणि ठाकरे हे याबाबतीत काय बोलणार याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
       

ऊद्या मंगळवारी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात  प्रबोधन शतकोत्सव सोहळ्याचा समारोप होणार असून या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, जनसंपर्क विभागाचे महासचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 7 वाजता प्रबोधनविषयक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे व त्यांचे कविवर्य मित्र सहभागी होणार आहेत. संयोजक किरण साळी यांनी ही माहिती दिली.

Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये