पुणे शहर

नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित दहीहांडीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी : सेलिब्रिटी व मान्यवर व्यक्तींची उपस्थिती..

बावधन : बावधन मधील नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित दहीहंडी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी तसेच प्रमुख राजकीय व्यक्तींच्या व जमलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जल्लोष पूर्ण वातावरणात फोडण्यात आली. या दहीहंडीने गर्दीचा उच्चांक  मोडल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.

बावधन मधील नगरसेवक किरण दगडे पाटील यांची दहीहंडी कोथरूड, बावधन पाषाण, बाणेर, बालेवाडी  परिसरातील नागरिकांसाठी कायमच आकर्षणाचा विषय राहिली आहे त्यामुळे दरवर्षी ही दहीहंडी गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करत चालली आहे.

यंदा दहीहंडीला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , अमृता फडणवीस, निर्मला रावसाहेब पाटील दानवे आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थिती लावत जमलेल्या गोपाळ भक्तांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. सिने-अभिनेते प्रवीण तरडे, आकाश ठोसर, ओम भूतकर क्षितिज दाते, अभिनेत्री, आमिषा पटेल, ईशा कोप्पीकर यांनी हजेरी लावत उपस्थितांची मने जिंकली. जय वरदायनी गोविंदा पथकाने ही हंडी फोडली.

रेडिओ जॉकी ( आर जे) श्रुती सूत्रसंचलन करत दहीहंडीच्या जल्लोष पूर्ण वातावरणात रंग भरले. माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधन च्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये