कोथरूडमध्ये पुणे मेट्रोच्या कारशेडमध्ये बंदुकीच्या गोळ्या आढळल्याने खळबळ

पुणे : Pune Metro पुणे मेट्रोच्या कोथरूड – वनाज मधील मेट्रो कार शेड मध्ये बंदुकीच्या गोळ्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या गोळ्या एके 47 बंदुकीतून फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.(Excitement over gunshots found in Pune Metro car shed in Kothrud)
हि घटना 25 ऑगस्ट रोजी घडली असून Kothrud कोथरूड पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत. पुणे मेट्रो च्या वनाज मधील मेट्रो डेपो मधील कामगारांच्या घरांच्या पत्र्याच्या शेड मधील पत्र्यावर या गोळ्या आढळून आल्या आहेत. या बंदुकीच्या गोळ्या लष्कराच्या सरावातील असल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत.
या घटनेमुळे मेट्रो चे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने कालच्या घटने मध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोथरुड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडला लागून लष्कराची हद्द आहे. त्यांच्याकडे याबाबत कोथरुड पोलिसांनी चौकशी केली असता काल २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या हद्दीत रेंजवर फायरिंग झाल्याची माहिती मिळत आहे, परंतु सापडलेल्या बंदुकीच्या गोळ्या त्याच आहेत का याबाबत तपास सुरू आहे. याबाबत लष्कराला पत्र देऊन माहिती घेऊन पुढील चौकशी करण्यात येईल असे कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले आहे.




