पुणे शहर

अमोल मिटकरींना पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महासंघातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येतोय. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही. 

ब्राम्हण महासंघाकडून मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलंय. यावर अमोल मिटकरी यांनी मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, भाषणात मी अपशब्द वापरले नाही, असं म्हटलं आहे.

Fb img 1650522168570
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये