पोलीस बांधवांना औक्षण करून भाऊबीज साजरी

पुणे : स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दिवाळी निमित्त दीपोत्सव व भाऊबीज कार्यक्रमाचे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम आणि पोलीस अधिकारी यांना महिलांनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली.
यावेळी संगीता चौरे, ज्योती कानेगावकर, उषा अवघडे, संगीता मोरे, मनीषा थनवाल, वनिता कदम, ज्योती भोंडे, अवंती धेडे, सुजाता लागू, सारिका गायकवाड, सारिका ठाकर, सुनीता भोसले, कविता साळुंखे, मंजिरी निवांगुणे, प्रगती शिंदे, पुष्पां शिंदे, प्रज्ञा उतेकर, दीपा शिताप आदी महिलांनी पोलिसांना औक्षण केले.पाडव्याच्या निमित्ताने पोलीस स्टेशन परिसरात दीपोत्सवचे आयोजन करत दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक महेश वाबळे, मनीषा वाबळे यांनी केले होते.

नगरसेवक महेश वाबळे म्हणाले कि, “पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडत असताना कुटुंबासोबत सण साजरा करता येत नाही. यंदा कोरोना नावाच्या संकटाचा मुकाबला करताना पोलिसांवर फार अतिरिक्त ताण पडलेला आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात बऱ्याच वेळा पोलीस स्टेशन हेच आपले घर मानून पोलिसांना तिथेच मुक्काम करावा लागला. नागरिक सण साजरे करत असताना पोलिसांवर मात्र कामाचा ताण वाढतो. परंतु तो ताण विसरून ते कर्तव्य करतात.”



यावेळी स्वाती दिवाण यांनी पोलीस कर्मचारी व सफाई कामगार यांच्या कामाचे कौतुक करणाऱ्या कविता सादर केल्या. प्रस्तावना शेखर कोरडे व भानुदास ढोबळे तसेच आभार हरिष परदेशी यांनी मानले.






