महाराष्ट्र

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार- उध्दव ठाकरे

मुंबई : दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे, त्याची चिंता करू नका असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही याबाबत संभ्रम असताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे.”

Img 20220910 wa0003

शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण या वर्षी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनीही दसरा मेळावा घेण्याचं नियोजन केलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनी आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला आहे.

Img 20220908 wa00044659491928105995052

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये