पुणे शहर
राष्ट्रवादी काँगेस पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (अजित पवार गट) पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दीपक मानकर यांना त्याबाबतचे नियुक्तीचे पत्र देखली देण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दीपक मानकर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. अजित पवार, सुनिल तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी दीपक मानकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपक मानकर हे गेल्या तीस वर्षांपासून पुणे शहरात राजकारणात सक्रीय आहेत. पुण्याचे उप महापौर, शिक्षण मंडळ अध्यक्ष, नगरसेवक अशा विविध जबाबदारी मानकर यांनी सांभाळली आहे.







