किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकां विरोधात गुन्हा दाखल

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आणि काही शिवसैनिक सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु त्या ठिकाणी झटपट झाल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुण्यात शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यांमुळे त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.




