पुणे शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘मिशन निर्मल स्वच्छ्ता अभियान’ राबविण्यात येणार माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची माहिती 

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरात राबविले जाणार स्वच्छ्ता अभियान 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे ‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली आहे.

बालवडकर म्हणाले, रविवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9: 30 वाजता पॅनकार्ड रोड बाणेर येथून या अभियानाला प्रारंभ होणार आहे.बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस व म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना स्वच्छतेच्या समस्या भेडसावत असल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या सहकार्याने हा भाग स्वच्छ, सुंदर व आदर्श ठिकाण बनविणे हे सदरील अभियानाचे उद्दिष्ट आहे.

Img 20250918 wa00162721786118569806017

तरी सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील कचरा व अस्वच्छ ठिकाणाचे फोटो, गुगल लोकेशन व माहिती आमच्या टीमपर्यंत पोहोचवावी, ही सर्वांना नम्र विनंती.स्वच्छ पुणे शहराच्या दिशेने आपण सर्वांनी हातभार लावूया आणि शहरातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ परिसर घडवूया. असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले आहे.

Img 20250906 wa0042281292667080974856625006
Img 20250913 wa02065865367835442147326
Img 20250508 wa00014407724251968801054

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये