पुणे शहर

कर्वेनगरमधील लक्ष्मी नारायण सोसायटीत गणेशोत्सव उत्साहात साजरा ; विविध स्पर्धांचे आयोजन

कर्वेनगर : कर्वेनगर मधील मातोश्री कॉलनी येथील लक्ष्मी नारायण गृहनिर्माण सहकारी संस्थेत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये लहान मुले तसेच महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत सोसायटीतील मुलांनी व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांनी जल्लोष करत स्पर्धेत सहभागी होत गणेशोत्सवाची रंगत वाढवली. सहाव्या दिवशी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते व पूजेनंतर ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.

यावर्षी सोसायटीतील गणेशोत्सवाचे नियोजन विजय बेंद्रे , लक्ष्मण सुतार , प्रबती पवार, राजेश माने, अजय बेंद्रे, प्रतिक नलावडे यांनी केले होते. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना संतोष शेट्टी, संजय नाईक, पराबती पवार, रतिष नायर, दीपक निकटे, तसेच विमल पवार, उषा नलावडे, हेमलता बेंद्रे, स्मिता वारणकर, अरूणा शेट्टी, मंगला रेणुके, शततारका माने, संगीता साळी, जयमाला रेवाळे यांचे हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

20220907 114745 0000

स्पर्धेचा निकाल

लिंबू चमचा स्पर्धेत
लहान गटात निहाल नलावडे याने प्रथम तर अवनी साबळे हीने द्वितीय क्रमांक मिळवला. मुली मोठ्या गटात
स्वरा तांबे, आर्या साळी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. मुले मोठ्या गटात अर्थ साबळे प्रथम तर कबीर बेंद्रे याला द्वितीय क्रमांक मिळाला.
महिला गटात प्राजक्ता नलावडे, अंजली पवार यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.

20220907 122508 0000

संगीत खुर्ची स्पर्धेत
मुले मोठ्या गटात रुद्रांश भालेकर, यश शेट्टी, कबीर बेंद्रे तर मुली मोठ्या गटात आर्या सागवेकर, स्वरा तांबे, आर्या साळी लहान गटात निहाल नलावडे, अवनी साबळे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटात स्वाती तांबे यांना प्रथम क्रमांक मिळवला.

रांगोळी स्पर्धा
रांगोळी स्पर्धेत स्वाती तांबे  प्रथम, स्नेहा बेंद्रे द्वितीय, प्रणिता साबळे तृतीय  तर अंजली पवार यांना चतुर्थ क्रमांक मिळाला.

20220907 123056 0000

चित्रकला स्पर्धा
चित्रकला स्पर्धेत लहान गटात अवनी साबळे हीने प्रथम तर निहाल नलावडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
मधल्या गटात कबीर बेंद्रे, स्वरा तांबे, हर्षिता माळी यांनी तर   तिसऱ्या गटात आर्या साळी, अर्थ साबळे, यश शेट्टी यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या गटात राजनंदिनी नागरगोजे हीला प्रथम क्रमांक मिळाला.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये