कोथरुड

डहाणूकर कॉलनीतील आकार मित्र मंडळाने भव्य मिरवणूक काढत दिला बाप्पाला निरोप..

ढोल ताशांच्या गजरात हजारो गणेशभक्तांनी धरला ठेका

कोथरूड : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात गणेशभक्तांना गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करता आला नाही. यंदा, मात्र प्रशासनाने विना अट आणि निर्बंधाविना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी राज्यातील सर्व गणेश मंडळांना दिली आहे. त्याचं पार्श्वभूमीवर यंदाचा हा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतोय.

डहाणूकर कॉलनी येथील आकार मित्र मंडळाच्या गणरायाचे सातव्या दिवशी भव्य मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. सात दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली. कमीन्स कंपनी ते डहाणूकर कॉलनी या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात हजारो गणेशभक्त या मिरवणुकीत सामील झाले होते.

Img 20220907 wa0203

“गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे आकार मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना काळातील दोन वर्षे सोडता सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या १५ दिवसांपासूनच मंडळाचे सर्व कार्यकर्ते यासाठी झटत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध नसताना आम्ही स्पीकर्स आणि साऊंड सिस्टीमसाठी आवाज मर्यादा पाळण्याचा प्रयत्न केला. कालच्या विसर्जन मिरवणुकीत देखील फटाके फोडायचे टाळून तसेच आवाज मर्यादा पाळून ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतल्याचे उत्सवप्रमुख सचिन फोलाने यांनी सांगितले.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये