पुणे शहर

कोथरूडमध्ये बढेकर ग्रुपच्या ‘हर्षदा’ या बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न..

पुणे : कोथरूड भागात सर्वात जास्त रीडेव्हलपमेंट बांधकाम प्रोजेक्ट साकारत असलेले आणि रामकृपा ही पहिली सर्वात उंच इमारत उभी करणाऱ्या बढेकर ग्रुपच्या रामबाग कॉलनीतील ‘ हर्षदा ‘ उत्सव जगण्याचा या भव्य बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर, हर्षदाचे सभासद यांच्या हस्ते हर्षदा बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. माजी नगरसेवक चंदू कदम , माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यावेळी उपस्थित होते. रामबाग कॉलनीत निसर्गरम्य परिसरात होणारा बढेकर शैलीतील हर्षदा गृह प्रकल्प कोथरूड मध्ये स्वप्नातलं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाचा पर्याय ठरणार आहे. सर्व काही हाकेच्या अंतरावर हे खास वैशिष्ठ्ये या बांधकाम प्रकल्पाचे असणार आहे.

Img 20221006 wa0205

हर्षदा सोसायटीत कला, साहित्य, पत्रकार, चित्रकार अशा विविध क्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने राहत असल्याने त्याचा विचार करून रीडेव्हलपमेंट करत असताना एक पूर्ण मजला खास कला क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम करण्यासाठी ठेवण्यात येणार असून एक अद्ययावत हॉल साकारला जाणार असल्याचे प्रविण बढेकर यांनी सांगितले. २ व ३ बीएचके फ्लॅट्स, चिल्ड्रन्स प्ले एरिया, टेरेस गार्डन, कॉन्फरन्स रूम, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अद्ययावत यंत्रणा, प्रशस्त पार्कींग अशी या बांधकाम प्रकल्पाची वैशिष्ठ्ये आहेत. बढेकर ग्रुपचा ‘ हर्षदा ‘ हा या वर्षातला १७ गृह प्रकल्प असून २७ चालू बांधकाम प्रोजेक्ट मध्ये घर घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

बढेकर ग्रुपची अशी ही एक श्रद्धांजली

नाते विश्वासाचे हे ब्रीद वाक्य घेऊन काम करत असलेला बढेकर ग्रुप आपल्या ग्राहकांबरोबर तर नाते विश्वासाचे जपतोच पण आपल्या बरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरही त्यांचे किती अतूट नाते आहे हे आजच्या कार्यक्रमा दरम्यान जाणवले. बढेकर ग्रुपच्या कार्यालयात काम करत असलेल्या निकिता लोखंडेचे नुकतेच निधन झाले. आपल्या कर्मचाऱ्याशी असलेले नाते जपण्यासाठी बढेकर ग्रूपने निकिता फाउंडेशनची स्थापना केली असून त्या माध्यमातून इंजिनियरिंग चे शिक्षण घेत असलेल्या १० गरजू विद्यार्थ्यांनींचा शिक्षणाचा खर्च दरवर्षी उचलण्यात येणार असल्याचे बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर यांनी आज जाहीर केले.

‘श्रीराम गाथा’ कार्यक्रमाने उपस्थित भक्ती रसात तल्लीन
या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी देवांच्या भाषेतून देवांची गाणी ‘श्रीराम गाथा’ हा गीत रामायणावर आधारित गीतांचा कार्यक्रम अश्विनी आपटे व धवल आपटे यांनी सादर केला. संस्कृत व मराठी या दोन भाषेतून गीत रामायणातील गीते यावेळी सादर करण्यात आली. भूषण करंदीकर यांनी रामायणातील संदर्भ देत आपल्या शैलीत या कार्यक्रमाचे निवेदन केले. भूमिपूजन सोहळ्याचे सूत्रसंचलन प्रा. अजित वारणशीवार यांनी केले.
स्वयेंश्री राम प्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती,
राम जन्मला ग सखी राम जन्मला,
जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा,
स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, या गीतांनी उपस्थित श्रीरामाच्या भक्ती रसात तल्लीन झाले.

Img 20221006 wa0245

बढेकर ग्रूपकडेच घर का घ्यावे..
नाते विश्वासाचे हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या बढेकर ग्रूपने आजपर्यंत आपल्या अनेक ग्राहकांना आनंदाच्या वास्तू निर्माण करून दिल्या आहेत, आणि त्या ग्राहकांबरोबर त्यांचे विश्वासाचे नाते मजबुतपणे आजही टिकून आहे, आणि याच विश्वासाच्या जोरावर बढेकर ग्रूपचे 27 मोठे गृहप्रकल्प कोथरुड आणि परिसरात आज सुरू आहेत. आणि त्यामध्ये आता हर्षदा या गृह प्रकल्पाची आता भर पडत आहे. बढेकर शैलीतील घर म्हणजे स्वप्नांना आकार देणारं घर असं म्हंटले जाते. घर घ्यायचे तेही अशा ठिकाणी जिथे नाते विश्वासाचे जपले जाते, म्हणजेच बढेकर ग्रुप शिवाय पर्याय नाही. त्यामुळे घर घेण्याचा विचार करत असाल तर जगण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हर्षदा मध्ये घर घेण्यासाठी तयार व्हा आणि बढेकर ग्रुपच्या हर्षदा या बांधकाम प्रकल्पाला भेट देऊन आपलं घर घेण्याचं स्वप्न साकार करा.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये