पुणे शहर

हनुमान चालीसाचे पठण करून मनसेकडून रावण दहन ; कोथरूडमध्ये हजारो नागरिकांची सहकुटुंब  अलोट गर्दी 

पुणे : दुष्कृत्यावर सत्कर्माची मात आणि वाईट प्रथांचा नाश करून चांगले गुण अंगी बाळगण्याचा संदेश देत विजयादशमीच्या मुहूर्तावर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नयनरम्य आतषबाजीत करण्यात आलेल्या रावण दहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रशांत कनोजिया व माजी नगरसेविका पुष्पाताई कनोजिया यांच्या वतीने  कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  शेकडोंनी लहान मुलांना बजरंगबली चे मुखवटे वाटले होते
कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच  होत असलेल्या या कार्यक्रमाला सुमारे अडीच हजारहून अधिक   नागरिकांनी सहकुटुंब  हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली . त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले व नंतर रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.रावणाचा पुतळा दहन करताना पुणेकरांनी  वाईट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प केला.

Img 20220924 182515 453

यावेळी पुण्याच्या सहायक पोलीस उपायुक्त पौर्णिमा  गायकवाड,एसीपी रुक्मिणी गलांडे,कोथरुडचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे,मनसेचे सरचिटणीस ॲड‌.किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पुणे शहराध्यक्ष वनिता वागस्कर, जिल्हाध्यक्ष सुशीला नेटके, कामगार सेनेचे नरेंद्र तांबोळी,शहर संघटक प्रल्हाद गवळी ,शैलेश जोशी,विद्यार्थी सेनेचे ॲड सचिन पवार,रुपेश घोलप,मनविसे पुणे शहर अध्यक्ष अमोल शिंदे ,केतन डोंगरे, निलेश जोरी, मनसे पदाधिकारी  मनसे पदाधिकारी विशाल पवार ,नितीन गायकवाड, सुभाष आमले, गणेश शिंदे, रमेश उभे, प्रसाद गोखले, निलेश सैंदाणे, उद्योजक मुरलीधर मानकर, विराज डाकवे, संजय काळे,सचिन विप्र आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  राजेंद्र पालवे व अरविंद मिश्रा यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,श्रीराम हनुमान चाळीसा महाआरती पठण केले

आयोजक   प्रशांत कनोजिया  ,माजी नगरसेविका
श्रीमती पुष्पा कनोजिया यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करताना नव्या पिढीला आपल्या परंपरेची माहिती करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये