मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानचा पुण्यात सेवाभावाचा अनोखा उपक्रम..

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात ; हजारो लाभार्थ्यांना सहाय्य
हा उपक्रम म्हणजे गरजूंच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न : मुरलीधर मोहोळ
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सहाय्यता अभियान रविवारी उत्साहात पार पडले. या उपक्रमांतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.
या अभियानात दिव्यांग बांधवांना कुबड्या, वॉकर, काठी, कमोड चेअर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांच्या दैनंदिन गरजांनुसार उपयुक्त साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा उपक्रम केवळ सहाय्यक साहित्य वाटपाचा नाही, तर गरजूंच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर १० हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांपर्यंत आवश्यक सहाय्यक साहित्य पोहोचविण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्यामागे सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वातून प्रेरणा घेत ‘सेवा हीच संघटना’ या विचाराला कृतीची जोड देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांचे नेतृत्व हे विकासकामांसोबतच समाजातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, वंचित आणि गरजू घटकांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी सातत्याने प्रयत्न करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची भावना त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते, असेही ते म्हणाले.









यावेळी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अजय खेडेकर, दिलीप वेडे-पाटील, विशाल धनवडे, किरण दगडे पाटील, महेश वाबळे, निलेश कोंढाळकर, सुनील पांडे, पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, दिनेश माथवड, व्यंकोजी खोपडे, सुभाष नाणेकर, नगरसेविका स्मिता वास्ते, पल्लवी जावळे, ॲड. मिताली सावळेकर, रूपाली धाडवे, अल्पना वर्पे, वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, धनश्री कोल्हे, मनीषा बुटाला, रूपाली पवार, वृषाली रिठे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



