पुणे शहर

बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक ;  तातडीने उपाययोजनांचे आदेश

बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, एनएचएआय, पीएमआरडीए आदी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Img 20250508 wa0001235733770892078245

या बैठकीत कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून आलेल्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सण-उत्सवाचा काळ सुरू होण्याआधी सर्व प्रमुख प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश  पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत नागरिकांनी ज्या मुद्द्यांवर भर दिला त्यात जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक येथील वाहतूक नियोजन, सिग्नल, वॉर्डन्सची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशनची उभारणी आणि दारू दुकानदारामुळे होणारा त्रास हे विषय होते.

Img 20250711 wa01938153452573979352517

नागरिकांनी विशेषतः नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, पदपथ अतिक्रमण, बसस्टॉपची आवश्यकता, रस्ते व फूटपाथ दुरुस्ती, झाडांची छाटणी, मेट्रो पुलाखालच्या ठिकाणी साचलेले पाणी, आणि रस्ते अधिग्रहणाच्या समस्यांबाबत सविस्तर मांडणी केली. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपास संदर्भातील मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर त्वरित उपयोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, हे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या बैठकीत बालेवाडीतील सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर,  राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Screenshot 20250710 110010 whatsapp2954762159264963718
Img 20250704 wa03105141954843688917612
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये