पुणे शहर

पुरातत्व विभागाच्या या भूमिकेमुळे शनिवारवाड्याची दुरवस्था ; संदीप खर्डेकर..

पुणे : pune पुरातत्व विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे पुण्यातील ऐतिहासिक वस्तू असलेल्या शनिवारवाड्याची shaniwarwada दुरावस्था होत चालली आहे. सुशोभीकरणासाठी बसवलेल्या वस्तूंची खराबी झाली असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हम कुछ नहीं करेंगे और किसी को कुछ करने नहीं देंगे ही पुरातत्व खात्याची भूमिका या सर्वाला जबाबदार असल्याचा आरोप क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केला आहे.

खर्डेकर यांनी सांगितले की, काही पाहुण्यांसह शनिवारवाडा येथे गेलो होतो तेव्हा तेथील दुरावस्था व पुरातत्व खात्याचा बेजबाबदार कारभार बघून दुःख आणि संताप आला. २५ रुपये प्रवेश शुल्क देऊन शनिवारवाड्यात जाताच समोरच दिसलेला तो धुराचा लोट पाहून मन अस्वस्थ झाले.

आत गेल्यावर निरीक्षण केले असता आणखी काही बाबी पुढे आल्या त्या म्हणजे १) सर्व माहितीफलक पुसट झाले असून त्यावरील माहिती नीट वाचता येत नाही. २) सर्व कारंज्यात घाण साचली आहे. ३) वाहने पार्क करताना तेथे रक्षकाची व्यवस्था नसल्याने वेडीवाकडी वाहने पार्क केल्याने अडकाअडकी व वादविवाद होत आहेत.४) लाईट अँड साउंड शो बंद असून आता सर्व निर्बंध शिथिल झाले असल्याने हा शो पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे ५) प्रेमी युगुलांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षकांना सूचना देणे आवश्यक आहे. .

मात्र या सर्व बाबींकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संदीप खर्डेकर यांनी  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पुणे चे गजानन मंडावरे यांना पत्र लिहून याबाबत तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पुरातत्व खात्याला  किमान स्वच्छता ठेवायला जमत नसेल तर पुणेकरांच्या ह्या मानबिंदूची स्वच्छतेसाठी माझ्या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व जबाबदारी उचलू त्यासाठी आपण फक्त योग्य परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी खर्डेकर यांनी केली आहे. तसेच शनिवारवाड्यास एकूणच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीच्या आपल्या खात्याच्या आश्वासनाची सद्यस्थिती काय याची ही माहिती उपलब्ध करून द्यावी अशीही विनंती त्यांनी केली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये