पुण्यात गोवा बनावटी मद्याची वाहतुक करतांना लग्झरी बससह विदेशी मद्यसाठा जप्त.

पुणे : राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १ पुणे यांनी कारवाई करत पुण्यातील कात्रजमध्ये गोवा बनावटी मद्याची वाहतुक करतांना लग्झरी बससह विदेशी मद्यसाठा जप्त केला. सदर वाहन व गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह रु.४२,९०,०००/- चा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक वाय. एस. शिंदे एस. बी. जगदाळे व एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १ पुणे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार कात्रज परिसरात गस्त घालत असतांना कात्रज गावच्या हद्दीत, जुन्या पुणे-सातारा रोडवरील, भारत पेट्रोल पंपाच्या समोर, कात्रज, पुणे इंटरसिटी स्मार्ट लग्झारी सहाचाकी बस क्र. MH-४८-C.B.- ११११ या वाहनाच्या तपासणी दरम्यान सदर वाहनाच्या डिक्कीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला ७५० मिली क्षमतेच्या बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या १८० सिलबंद बाटल्या (१५ बॉक्स) मिळून आले.

सदर वाहन व गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह रु.४२,९०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीनामे गणेश बाळकृष्ण चव्हाण, वय – ५० वर्षे, रा. मु.पो. कडावळ, सुर्वेवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, तसेच त्याच्या सोबत असलेले अक्षय अनंत जाधव, वय – ३२ वर्षे, रा. जी / ३०४, इंद्रप्रस्थ सीएचएस लि., एस. टी. डेपो रोड, नाळे, नालासोपारा (पश्चिम) जि. पालघर व उमेश सिताराम चव्हाण, वय – ३७ वर्षे, रा. कासारवाडी, आवळेगाव,ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुध्द मुबंई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (A) (E), ८१,८३,९० व १०८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३०/२०२३ दिनांक ०६/१०/२०२३ गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १ पथकचे निरीक्षक एस.एल. पाटील, आर.पी. शेवाळे, विठ्ठल बोबडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुक, बी.एस. घुगे, प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक तसेच राजेश एम. पाटील सह. दु. नि. व जवान सर्वश्री जयराम काचरा, शरद हंडगर, मुकुंद पोटे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बी. एस. घुगे, दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत.








