पुणे शहर

पुण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तर्फे ऑक्सिजन बॅंक सेवा सुरू

पुणे : माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालय येथे मंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने ऑक्सिजन बॅंक (मोफत सेवा) ऊपलब्ध करुन देण्यात आली.

या लोकार्पण प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे ,राजेंद्र शिंदे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर समन्वयक तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक राजाभाऊ भिलारे , तुळजापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख महादेव पवार अणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोथरूड विधानसभा सहाय्यक कुणाल कांदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले

जरी कोरोनाचे संकट काही अंशी कमी झाले असले तरीही निष्काळजी न राहता योग्य ती खबरदारी घेऊन आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे मान्यवरांनी या वेळी सांगितले

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये