पुणे शहर

भरत मित्र मंडळ व महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्टतर्फे महाशिवरात्री निमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन

पुणे : गणेश वंदना, शिवस्तुती, श्रीरामाची प्रार्थना नृत्यविष्काराने सादर करत मुला मुलींनी रसिकांची मने जिंकली.भरत मित्र मंडळ व महाशिवरात्र उत्सव मंडळाने महाशिवरात्री निमित्त नारायण पेठेत मोदी गणपती जवळ आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले.या महोत्सवाचे हे 45  वर्ष आहे.

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक ॲड  मंदार जोशी, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, सामाजिक कार्यकर्ते अंजनेय साठे  श्रीमती सुजाता चिंता, तेजस्विनी दाभेकर उपस्थित होते.

Img 20240202 wa00034606059587729487622

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले कि, महोत्सवामुळे तरुणांना व कलावंताना व्यासपीठ मिळते त्यांना प्रोत्साहन मिळते भरत मित्र मंडळाने त्यांना चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे श्री दाभेकर समाजपयोगी कार्य करत कृतज्ञतेचि भावना जपली आहे.

दीपक मानकर म्हणाले कि श्री दाभेकर यांनी या महोत्सवाद्वारे महाराष्ट्रच्या संस्कृतीची सांस्कृतिक वारसा जतन केला आहे

या महोत्सवत कल्चर्स ऑफ इंडिया, स्वामिनी वाडकर, रत्नाकर शेळके, जतीन पांडे यांच्या डान्स ग्रुपच्या मुलामुलींनी सादर केलेल्या नृत्यविष्काराने नागरिकांना आनंद मिळवून दिला

प्रसिद्ध कलावंत संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले सामाजिक कार्यकर्ते अनिल येनपुरे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये