पुणे शहर

महापौरांच्या प्रभागातील एक कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

कोथरूड :  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभाग क्र. १२ मधील कोथरूड गावठाण तेजसनगर परिसरात रस्ते काँक्रीटीकरण करणे व ड्रेनेज लाईन बदलणे तसेच फुटपाथ बसविणे असे १ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ,नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, भाजयुमो महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस व नगरसेवक सुशील मेंगडे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रभागाचे अध्यक्ष अमित तोरडमल, दिनेश माथवड तसेच प्रभागातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

मोहोळ म्हणाले,गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना नागरीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहून प्रामाणिकपणे कार्य करत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये