पुणे शहर

बाणेर-बालेवाडी परिसरातील वीज पुरवठा नियमित करण्यासाठी अमोल बालवडकर यांच्याकडून प्रस्तावित सबस्टेशनच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांशी चर्चा 

पुणे : बाणेर-बालेवाडी भागात वारंवार होत असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच बालेवाडी स. नं. ४ येथील प्रस्तावित सबस्टेशनच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, सध्या बाणेर-बालेवाडी भागाला NCL EHV मधून सुमारे १५० मेगावॅट, तर सुस-म्हाळुंगे भागाला हिंजवडी EHV मधून ७५ मेगावॅट वीजपुरवठा केला जात आहे. मात्र वाढत्या आयटी हब आणि लोकसंख्येमुळे नव्या सबस्टेशनची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

Img 20251125 wa01783213374507166536090

२०१९-२०२० मध्येच या सबस्टेशनसाठी जागा सुचवूनही प्रशासन काळामध्ये व आपले उदासीन आमदार मंत्री यांच्यामुळे सदर कामामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. महापारेषणने २०२७-२८ मध्ये निधीची तरतूद प्रस्तावित केली असली तरी हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी मुख्यमंत्री मादेवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे बालवडकर म्हणाले.

सदर जागेवरील अनेक वर्षांपासूनचा डेब्रीस व राडारोडा हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच तो हटवून सबस्टेशनचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. हे सबस्टेशन पूर्ण झाल्यानंतर बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि नियमित होण्यास मोठी मदत होणार आहे.यावेळी महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता कर्पे, सहा-अभियंता पठाडे व मोमीन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये