पुणे शहर

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांसह किरण दगडे पाटील यांची पाहणी.

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून बहुमजली उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पण सध्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल होत असल्याने चांदणी चौक व बावधन परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काम सुरू असतानाही वाहतूक कशी सुरळीत राहील यासाठी नगरसेवक किरण दगडे यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली.

यावेळी  पुणे ट्रॅफिक पोलीसचे डी. सी. पी. आनंद भोईटे पुणे महापालिका अभियंता स्वप्नील खोत व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बावधन भागातील ॲक्सिस बँक परिसर, मराठा मंदिर चौक, शिंदेनगर परिसर आणि रामनगर कॉलनी परिसरामध्ये ट्रॅफिक पोलीस नेमण्याची  मागणी किरण दगडे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

बावधन परिसरात वाहतूक नियमांसदर्भात कोणतेही सूचना फलक नसताना नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या वतीने थर्मोप्लास्टिक पट्टे व नो पार्किंगचे फलक लागेपर्यंत नो पार्कींगची कारवाई करू नये अशी मागणी दगडे पाटील यांनी केली आहे.

चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम होत असताना या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने त्यानुसार वाहतुकीत बदल होत असतात. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे ज्या वेगाने पुलाचे काम सुरू आहे, ते पाहता लवकरच तो पूर्ण होऊन आपली कायमस्वरूपी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले. 

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये