पुणे शहर

पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील समस्या आणि विकासकामे मार्गी लावण्याबाबत व्यापक बैठक-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, स्वच्छता, विहिरी संवर्धन, महापालिका वसाहत पुनर्निर्माण आदी विकासकामे मार्गी लावण्याच्या  दृष्टीने महत्त्वाच्या ३४ मुद्द्यांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समवेत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. 

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विकासकामे आणि अन्य नागरी सुविधांच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुक्त राम यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांना दिल्या. शिवाय कामांच्या प्रगतीचा आढावा सहा महिन्यांनी घेतला जाईल, असेही आश्वासन आयुक्तांनी, आमदार शिरोळे यांना दिले.

Fb img 17620776420884188237802217418510

महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करणे आणि इनोव्हेशन हबची उभारणी करणे, जंगली महाराज रस्त्यावरील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प मार्गी लावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडचे रुंदीकरण करणे, औंधमधील भाजी मंडई, जलतरण तलाव, ड्रेनेज लाईन सुधारणा आदी कामे, छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे आणि उद्यानाचे सुशोभीकरण करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, कचऱ्याचे निर्मुलन करणे आणि अतिक्रमण हटविणे, महापालिका शाळांच्या इमारतीत दुरुस्त्या करणे, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल करणे, मुळा आणि मुठा नद्यांचे संवर्धन करणे,  रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहिरींचे जतन आणि संवर्धन करणे, वाकडेवाडी, पांडवनगर येथील महापालिका वसाहतींचे (कॉलनी) पुनर्निर्माण करणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणि केबल व्यवस्थापन यांसारखे नागरिकांशी निगडित अनेक विषय वेगाने मार्गी लागतील, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये