कोथरुड

सफाई कर्मचारी हा आधुनिक काळातील खरा देवदूत ; रोटरॅक्ट क्लबकडून कर्मचाऱ्यांचा सन्मान..

कोथरुड : pune city, रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोथरूड मधील सफाई कामगाराना मोफत दिवाळी सणाचे किरणा किटचे वाटप  करून कामगारांचा सन्मान करण्यात आला.

डहाणूकर कॉलनी मधील कमिन्स हॉल मध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे व रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. सदर किट्सचे वाटप प्रकाश आवचट, प्रतिभा जगदाळे व अजय मुटाटकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करताना रोटरीचे किरण इंगळे म्हणाले की,  की,”सफाई कामगार घाणीत राबणारा, स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पुणेकर नागरिकांचे आरोग्याचे रक्षण करणारा आधुनिक काळातील खरा देवदूतच आहे. या देवदूताचे खऱ्या अर्थाने पुजन होणे अतिशय महत्वाचे कार्य आहे.  सफाई कामगाराच्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावे, त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून रोटरॅक्ट क्लबच्या वतीने दिवाळी भेट म्हणून हे किट्स वाटप करत आहोत. सफाई काम करत असताना कर्मचाऱ्यांनी वेसनापासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या मुला मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन त्यांनी  केले.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

प्रतिभा जगदाळे  म्हणाल्या कि,” समाजाची घाण साफ करणारा, कोविडच्या काळातील सफाई कामगाराचे कार्य अतुलनीय,अप्रतिम असे महान कार्य आहे. त्यांच्या कार्याला रोटरॅक्ट क्लबचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मानाचा मुजरा करतो. तसेच खरा देव शोधायचा असेल तर तर सफाई कामगारामध्येच आहे असे आम्हाला वाटते. संत गाडगे महारांजाचा वारसा चालवणारे खरे वारकरी सफाई कामगार आहेत त्यांचा मान सन्मान व त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे तसेच सामाजिक कार्याचे उद्दिष्ट ठेवून रोटरॅक्ट क्लब काम करत आहे.

Img 20211028 wa0118

सफाई कामगांराच्या सत्काराला उत्तर देताना मोकादम वैजीनाथ गायकवाड असे म्हणाले कि,” सफाई कामगारांना दिवाळी सणाच्या निमित्ताने मोफत किडट्स देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल रोटारॅक्ट क्लब ऑफ सहवासचे आभार. असेच कौतुकाची थाप आपल्यासारख्या संस्थेने द्यावी हे मी आमचे भाग्य समजतो”. सदर कार्यक्रमास आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार मोकादम अण्णा ढावरे व एकूण ७५ कामगार उपस्थित होते.प्रकाश अवचट यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष केदार इंगळे यांनी केले.

Img 20211104 wa0543
Img 20211102 wa0292
Fb img 1636016574694
Fb img 1636018180328
Fb img 1636016398948
Fb img 1636016631083
Img 20211104 wa0269
Img 20211103 wa0158
Img 20211104 wa0275
Img 20211104 wa0232
Img 20211104 wa0197 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये