पुणे शहर

परवानगी देताना निवासी, अनिवासी इमारतींचे नामफलक हे मराठी भाषेत बंधनकारक करण्याची मनसेची  मागणी..

पुणे : पुणे शहरातील सर्व नवीन इमारती तसेच भविष्यात होणाऱ्या निवासी व अनिवासी बांधकाम परवानगी देताना सदरील इमारतीचे नाव हे मराठी भाषेमध्ये नामफलक मध्ये
लावण्यास बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन मनसेचे प्रदेश संघटक प्रशांत कनोजिया यांच्या वतीने पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.  या संदर्भात प्रशांत कनोजिया यांनी म्हंटले आहे की,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठी भाषेचे नामफलक बंधनकारक असताना या निर्णयाचे पालन पुणे शहरात मध्ये होताना आढळत नाही अनेक इमारतींवर इंग्रजी भाषेत मध्ये नामफलक लावलेले आहेत.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभाग, येथे पुणे शहरातील सर्व नवीन निवासी व अनिवासी इमारती तसेच भविष्यात मान्य होणाऱ्या सर्व बांधकाम परवानगी देताना बांधकाम परवानगीच्या अटी शर्ती मध्ये बांधकाम परवानगी मागणाऱ्या सर्व निवासी व अनिवासी इमारतीला नाव हे मराठी मध्ये नामफलक इतर भाषेपेक्षा मोठ्या अक्षरात लावण्यात यावे असा नियम त्वरीत परिपत्रक काढुन अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे.  पुणे शहरातील सर्व निवासी, अनिवासी इमारती परवानगी च्या अटी शर्ती मध्ये याचा उल्लेख करून भोगवटा पत्र देण्याच्या आधी तपासणी करण्यात यावी अशी विनंती आम्ही पालिका प्रशासनाला केली असून याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याचे कनोजिया यांनी सांगितले.

Img 20250310 wa02324095435649637866308

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये