पुणे शहर

किरण दगडे पाटील जनेतेची सेवा करण्यासाठी कायम तत्पर : अमृता फडणवीस यांच्याकडून कौतुक..

कोथरूड : किरण दगडे पाटील हे जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. आज त्यांनी शाळकरी मुले, महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले या गोष्टीचा मला आनंद आहे. आपले नेते हे त्यांच्यासारखे हवेत अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे कौतुक केले.

Img 20250113 wa02584784048269614731131

कोथरूड, भुसारी कॉलनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांची सुरुवात हा एक प्रेरणादायी क्षण ठरला. यावेळी अभिनेत्री स्नेहल तरडे, सूर्यदत्ता कॉलेजचे संजय चोरडिया, सुषमा संजय चोरडिया, नवचैतन्य हास्य क्लब चे संस्थापक विठ्ठल काटे. मकरंद टिल्लू उपस्थित होते.

Img 20250113 wa02498588825091993093653

यावेळी अमृता फडणवीस यांनी उपस्थित सर्व देवेंद्रजींच्या लाडक्या बहिणी माझ्या नणंदा असून आमचं एक नातं आहे. अस म्हणत “आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्र तुमच्या पाठीशी आहेत प्रगती व्हावी तुमची झकास” असा उखाणा घेत उपस्थित महिला वर्गाची मने जिंकली.

Img 20250113 wa0253372999461696428158

यावेळी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी ऊर्जा मिळावी म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करावी यासाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हळदी कुंकवाचा कार्यक्रमात स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हसरे पुणे – पर्यावरण व आरोग्यासाठी एक नव्या  उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

सर्वांच्या पाठिंब्यानेच हा कार्यक्रम अधिक व्यापक झाला. आज सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा निश्चितच महिलावर्गाला लाभ होईल. आपलं प्रेम आणि सहकार्य असंच राहू द्या असे आवाहन माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी यावेळी केले.

Img 20240404 wa0017281298374058713843994116
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये