कोथरुड

लग्नघरी चोरी झालेल्या कुटुंबाला नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून भांड्याची झाल भेट..

कोथरुड : कोथरुडमधील लोकमान्य वस्तीत चोरीमुळे संकटात सापडलेल्या लग्नघर असलेल्या कुटुंबाला नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या कडून मदतीचा हात देण्यात आला आहे. संबधित कुटुंबाला लग्नात देण्यात येणाऱ्या सर्व भांडी (झाल)त्यांच्याकडून भेट देण्यात आली आहे.

लोकमान्य वस्तीत राहणाऱ्या सुधामती दादा धडे यांच्या घरी  काही दिवसांपूर्वी चोरी झाली. या चोरीत चोरांनी मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे चोरून नेल्याने या कुटंबावर संकट कोसळले. मुलीच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीचा खर्च कसा करायचा असा प्रश्न या कुटुंबास समोर उभा राहिला होता.

परंतु स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील या कुटुंबाच्या मदतीला धावून आले असून त्यांनी लग्नात मुलीला देण्यात येणाऱ्या सर्व संसार उपयोगी भांड्याचा खर्च उचलून या कुटुंबाचा काही प्रमाणात भार हलका केला आहे. दगडे पाटील यांच्याकडून आज संपूर्ण भांड्यांची झालं आज धडे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.

गरजू कुटुंबांना लग्न कर्यात काहीना काही मदत करण्याचा उपक्रम गेली ५ वर्षांन पासुन किरण दगडे पाटील यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये