नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त प्रभागातील गणेश मंडळांना सदिच्छा भेट..

नागरिकांना सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्य मिळावे यासाठी गणरायाकडे प्रार्थना
कोथरूड : श्री गणेश जयंती निमित्ताने नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर मधील हनुमाननगर, केळेवाडी, राऊतवाडी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानीनगर, म्हातोबानगर परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रभागातील विविध गणेश मंडळांमध्ये नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात असल्याबद्दल हर्षवर्धन मानकर यांनी समाधान व्यक्त केले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सहकार्य व सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मानकर म्हणाले, गणेश जयंती हा दिवस गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक दिवस आहे. आज हा दिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि निरोगी आरोग्य मिळावे अशी मी आजच्या मंगलदिनी गणरायाचरणी प्रार्थना करतो.













