किरण दगडे पाटील यांचं काम लोकोपयोगी ; अमृता फडणवीस

बावधन – कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात ऊर्जा पुरस्काराचे वितरण
कोथरूड : परंपरा, लोककला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा झंकार कोथरूड भुसारी कॉलनी, बावधन मधील नागरिकांना एकत्र अनुभवता आला तो माजी नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सवातील फोक प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून.. एका आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक पर्वाचा आनंद या महोत्सवात सहभागी होत नागरिकांनी घेतला.
माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला अमृता देवेंद्रजी फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रभागातील मुलींसाठी 500 सायकल वाटप करण्यात आले, तर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.

अमृता फडणवीस म्हणाल्या, किरण दगडे पाटील यांचं काम लोकोपयोगी असतं. मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांना आले आहे. ते सातत्याने घेत असलेले उपक्रम मी पाहिले आहेत. नागरिकांसाठी जे उपयोगी आहे असे उपक्रम व कार्यक्रम ते कायम राबवत आले आहेत.
यावेळी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वैद्यकीय, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विश्वास पाटील, डॉ. वेदावती पुरंदरे, देवयानी मुंगली आणि कल्याणी संभूस यांचा ऊर्जा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, अभिनेते प्रविण तरडे, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष गणेश वरपे, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची परंपरा लोकनृत्य, लोककला आणि सांस्कृतीतून फोक प्रबोधन मधील कलाकारांनी नागरिकांसमोर उत्कृष्टपणे उभा केली आणि हा अनोखा सोहळा रसिकांनी डोळ्यात साठवून घेतला.
बावधन खुर्द येथील एलएमडी चौकातील राजा शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे हा कार्यक्रम पार पडला.



गरजू मुलींना सायकल वाटप, समाजाला आपल्या कार्यातून ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करताना मनाला समाधान मिळाले आहे. बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सवातील फोक प्रबोधन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवता आले. नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला अशा भावना माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केल्या..















