पुणे शहर

शिवसंग्रामचे सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ यांचे निधन

पुणे : शिवसंग्राम पुणेचे संस्थापक सदस्य, शिवसंग्राम संघटनेचे सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने आज निधन झाले. 

त्यांचे मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ओहोळ यांनी संघटनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केला. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जात होते.

त्यांच्या जाण्याने शिवसंग्राम संघटनेची व त्यांच्या कुटुंबियांची कधीही भरून निघणार नाही अशी हानी झालेली आहे. संपूर्ण शिवसंग्राम संघटना त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)यांच्याकडूनही किरण ओहोळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये