राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड..

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने किशोर कांबळे यांची निवड जाहीर केली आहे.
कांबळे यांच्या सोबत मनोज पाचपुते व अजिंक्य पालकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यपदी निवड करण्यात आली आहे. पाचपुते हे वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर, पर्वती विधानसभा मतरासंघाचे तर पालकर हे कसबा, खडकवासला, कोथरुड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे प्रभारी असणार आहेत.
निवड झाल्यानंतर सिंहासन न्यूजशी बोलताना किशोर कांबळे म्हणाले, सामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पक्षाने विश्वास दाखवला असून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवणार असून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे.




